लॉकडाऊनमुळे बिझनेस ठप्प; कर्जामुळे तरूण उद्योजक बनले चोर - NEWS E HUB

Slider Widget

Monday 31 August 2020

लॉकडाऊनमुळे बिझनेस ठप्प; कर्जामुळे तरूण उद्योजक बनले चोर


लॉकडाऊनमुळे बिझनेस ठप्प; कर्जामुळे तरूण उद्योजक बनले चोर

नागपूर: करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू करण्यात आला. या करोना महामारीच्या काळात उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील व्यापारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी व्यावसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. व्यावसायात झालेल्या नुकसानीमुळे दोन व्यापारी करणाऱ्या टोळीत सामील झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आपल्या व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या धडपड करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी करोना काळात आर्थिक संकट कोसळल्यामुळे दुचाकी चोरीचा मार्ग पत्करला. सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले की, वाहन चोरीप्रकरणी मोनिश ददलानी (वय २७) आणि सेवक गुमनानी (वय २२) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बिझनेसमध्ये नुकसान, म्हणून बनले चोर चोरी केलेल्या सर्व वाहनांची किंमत जवळपास तीन लाख रुपये आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाला आहे. मोठं नुकसान झालं आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे वाहन चोरीचा मार्ग अवलंबला. पोलिसांनी या दोघांना अटक करून चौकशी सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment