लता मंगेशकर यांची इमारत सील; प्रभुकुंज इमारतीतही करोनाचा शिरकाव - NEWS E HUB

Slider Widget

Sunday, 30 August 2020

लता मंगेशकर यांची इमारत सील; प्रभुकुंज इमारतीतही करोनाचा शिरकाव


लता मंगेशकर यांची इमारत सील; प्रभुकुंज इमारतीतही करोनाचा शिरकाव

मुंबई: गानसम्राज्ञी राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत करोनाचा रुग्ण आढळल्याने महापालिकेने ही इमारत सील केली आहे. या इमारतीत बुजुर्ग व्यक्ती अधिक राहत असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी ही कार्यवाही केली. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच मुंबईतील करोनाची संख्या नियंत्रणात येत असतानाच लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीत राहणाऱ्यांमध्ये बुजुर्गांची संख्या अधिक असल्याने ही सोसायटी सील करण्यात आली आहे. ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार असून सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे. या सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर राहतात. दरम्यान, पालिकेच्या कार्यवाही नंतर लता मंगेशकर यांना विचारपूस करणारे फोन येऊ लागल्याने त्यांनी एक पत्रक काढून त्याबाबतची माहिती दिली आहे. प्रभुकुंज सोसायटी बंद करण्यात आली आहे का? याची विचारणा करणारे फोन आम्हाला संध्याकाळपासून येत आहेत. बिल्डिंगची सोसायटी आणि महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुजुर्गांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही इमारत सील करण्यात आली आहे. करोना संसर्गापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं लता मंगेशकर यांनी निवेदनात म्हटलं आहे. करोनाचा प्रकोप पाहता आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आमच्या कुटुंबातील सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कुटुंबीयांबाबत कृपया कोणीही अफवा पसरवू नका. एक कुटुंब म्हणून सोसायटीतील सर्वजण करोनाबाबत सतर्क असून करोना रोखण्याबाबतच्या नियमांचं काटेकोरपालन करत आहेत. सोसायटीतील बुजुर्ग व्यक्तींना काहीही होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सध्या देवाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब सुरक्षित आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. वाचा: दरम्यान, राज्यात शनिवारी ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. शनिवारी निदान झालेले १६,८६७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.

No comments:

Post a Comment