थरार! रात्रीची वेळ होती, तो दुचाकीवरून जात होता; अचानक पाठिमागून... - NEWS E HUB

Slider Widget

Monday 31 August 2020

थरार! रात्रीची वेळ होती, तो दुचाकीवरून जात होता; अचानक पाठिमागून...


थरार! रात्रीची वेळ होती, तो दुचाकीवरून जात होता; अचानक पाठिमागून...

म. टा. प्रतिनिधी, नगर: रात्रीच्या वेळी दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीचा पाठलाग करून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडील पैसे व त्याची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार शेवगाव ते या मार्गावरील ढवळेवाडी फाट्याजवळ घडला आहे. या प्रकरणी काल पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत रामकिसन मरकड हे शनिवारी मध्यरात्री सुमारास बोधेगाव येथून तिसगावला दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी शेवगाव ते नगर या रस्त्यावर ढवळेवाडी फाट्याजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी मरकड यांचा पाठलाग केला. त्यानंतर धावत्या दुचाकीवरूनच एका चोरट्याने मरकड यांच्या दुचाकीला जोराची लाथ मारली. त्यामुळे मरकड हे दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चोरट्यांनी मरकड यांच्याजवळ येत त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली, तसेच त्यांची मोटरसायकल बळजबरीने हिसकावून घेत चोरटे निघून गेले. या प्रकाराबाबत मरकड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मरकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तांबे करत आहेत.

No comments:

Post a Comment