१८०० रुपयेवाल्या व्हायरल काकूंची राज्य सरकारकडून गंभीर दखल - NEWS E HUB

Slider Widget

Monday 31 August 2020

१८०० रुपयेवाल्या व्हायरल काकूंची राज्य सरकारकडून गंभीर दखल


१८०० रुपयेवाल्या व्हायरल काकूंची राज्य सरकारकडून गंभीर दखल

मुंबई: १८०० रुपयाच्या हिशेबावरून एका तरुणासोबत वाद घालणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे. सर्वच जण या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. व्हिडिओवरून राजकीय टीकाटिप्पणीही सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी या व्हिडिओची गंभीर दखल घतेली आहे. वाचा: ठाकूर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यात त्या म्हणतात, 'घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. 'महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही सरकारच्या पुढील एक आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत,' असंही त्यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे. व्हायरल व्हिडिओत नेमकं आहे काय? व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक काकू एका तरुणाकडे १८०० रुपयांचा हिशेब मागत आहेत. आपण अठराशे रुपये दिल्याचं हा तरुण सांगतोय. पण काकूंना ते मान्य नाही. तरुण म्हणतो, मी तुम्हाला ५०० रुपयांच्या तीन नोटा म्हणजे दीड हजार रुपये आणि २०० रुपयांची एक नोट आणि १०० रुपयांची एक नोट मिळून ३००... असे एकूण मिळून १८०० रुपये दिले आहेत. तरुणाने दिलेला नोटांचा हिशेब काकूंना मान्य आहे. पण १८०० रुपये मिळाल्याचं मान्य नाही. त्या म्हणतात, तुम्ही मला दीड हजार आणि ३०० रुपये दिलेत. मला १८०० रुपये हवेत. काकूंच्या हा भोळसटपणाचा सोशल मीडियावर विशेषत: मोबाइलवर आनंद घेतला जात आहे.

No comments:

Post a Comment