सुशांत प्रकरण: संदीप सिंहचा भाजपमधील 'हँडलर' कोण?; काँग्रेसचा प्रश्न
मुंबई: याच्या आत्महत्या प्रकरणात सध्या चर्चेत असलेला त्याचा मित्र याचे भाजपशी खूप जवळचे संबंध असल्याचा दावा काँग्रेसनं एका वृत्ताच्या हवाल्यानं केला आहे. 'लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संदीप सिंह याने महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात ५३ वेळा फोन केले होते, असा दावाही काँग्रेसनं केला आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटच्या संदर्भात सीबीआय संदीप सिंहची चौकशी करणार आहे. हे समजताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो ट्वीट केला होता. संदीप सिंह हा बॉलिवूडमधील एक निर्माता असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला होता. त्यामुळं भाजपशी असलेल्या त्याच्या संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. आज पुन्हा सावंत यांनी एका चॅनेलचा हवाला देत ट्वीट केलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा भाजपला घेरलं आहे. 'संदीप सिंह यानं महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयातील लँडलाइनवर १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात तब्बल ५३ वेळा फोन केला होता, असं कॉल रेकॉर्डमधून समोर आलं आहे. त्यावरून सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न असे... 'संदीप सिंह हा भाजपच्या कार्यालयात नेमका कोणाशी बोलायचा? भाजपमध्ये संदीप सिंहचा 'हँडलर' कोण आहे? २०१८ मध्ये संदीप सिंह भारतीय दूतावासाच्या परवानगीने मॉरिशसला गेला होता. तिथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाचं पुढं काय झालं? मोदी सरकारनं त्याला वाचवला का? लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीची भाजपनं पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट बनवण्यासाठी निवड का केली? वाचा:
No comments:
Post a Comment