मुंबईः राजकिय घडामोडी असो किंवा मनोरंजन विश्वातील अपडेट ट्विटरवर नेहमीच प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी ट्रेंड होत असतात. असाच सध्या ट्विटरवर ट्रेंड होणारा हॅशटॅगनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण हा हॅशटॅग ट्रेंड होत असतानाच यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे. असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. () वाचाः समीत ठक्कर या युजर्सनं जून आणि जुलैमध्ये त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून उद्धव ठाकरे आणि यांनी मुघल राजशी तुलना केली होती. या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मोहम्मद शाह उर्फ बेबी पेंग्विन असा केला आहे. युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. वाचाः समीत ठक्करवर आक्षेपार्ह लिखाण करणे, लेख लिहिणए, चित्रं काढणे आणि त्याचा प्रसार करणे आदीसाठींच्या कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली सुद्धा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच, ठक्करचा जबाब नोंदवून घेण्यासाठी त्याला समन्स बजावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठक्करने सोशल मीडियावरून केवळ ठाकरे सरकारचा अपमानच केला नव्हता तर या सरकारची खिल्लीही उडवली असल्याची तक्रार मिश्रा यांनी दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी सांगितलं.
Slider Widget
Thursday, 16 July 2020
ट्विटरवर का ट्रेंड होतोय बेबी पेंग्विन हॅशटॅग? शिवसेनेशी काय आहे संबंध?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment