पुणे तिथे काय उणे; सोन्याचा नेकलेस मास्क बाजारात - NEWS E HUB

Slider Widget

Thursday 16 July 2020

पुणे तिथे काय उणे; सोन्याचा नेकलेस मास्क बाजारात

पुणेः करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे बंधनकारक आहे. या जीवघेण्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क हा सर्वांसाठीच महत्त्वाचा ऐवज झाला आहे. बाजारात मास्कचे निरनिराळे ट्रेंडही सुरू झाले आहेत. सराफ व्यापाऱ्यांनीही डिझाइनचे सोन्या-चांदीचे मास्क बाजारात आणले आहेत. पुण्यातील एका ज्वेलर्सनं चक्क नेकलेस कम मास्क साकारला असून सध्या या मास्कची सर्वत्र चर्चा आहे. पुण्यातील रांका ज्वेलर्सनं हा नेकलेसची डिजाइन असलेला मास्क साकारला आहे. हा मास्क तब्बल १२४. ४ ग्रॅमचा असून त्याची किंमत ६ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. हा मास्क कम नेकलेस एन-९५ मास्कवर शिवून तयार केला आहे. २५ दिवसांनी या मास्कला धुवून पुन्हा वापरता येऊ शकतो. वाचा: करोना काळात अनेक लग्नसंमारभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळं अनेक नववधुंच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. त्यामुळंच खास लग्नसमारंभासाठी या मास्कची निर्मिती केली गेली आहे. या मास्कचा एकदा वापर केल्यानंतर सोप्या पद्धतीने बदलताही येऊ शकतो. आतमधील मास्क खराब झाल्यानंतर तो बदलता येतो. हा मास्क तयार करण्यासाठी २-३ आठवड्यांचा कालावधी लागला होता. वाचा: दरम्यान, महापालिकेने प्रयोगशाळांच्या चाचण्यांसह अँटीजेन चाचणी करण्यास सुरुवात केल्याने चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. शहर, जिल्ह्यात १५१० जणांना लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या ४२ हजाराच्या पुढे गेली आहे; तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुग्णसंख्या ३० हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. ७४६ जणांना शहरात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने गंभीर; तसेच अत्यवस्थ रुग्णांच्या संख्येतही भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासूनही संख्या वाढत असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. वाचा:

No comments:

Post a Comment