अहमदनगर: राज्यात तसेच केंद्रात भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवर किती आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असले, तरी नगरमध्ये भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार हे नगरच्या विकासासाठी उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे दिसले. वाचा: मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व संग्राम जगताप हे आज एकाच पत्रकार परिषदेमध्ये एकत्र आले. अर्थात नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा उड्डाणपूल व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी केली. या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर विखे हे खासदार होऊन दिल्लीत गेले, तर त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगरच्या विधानसभा मतदार संघातून संग्राम जगताप निवडून येऊन आमदार झाले. मात्र आता पुन्हा एकदा विखे व जगताप हे उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. नगरमधील बहुप्रतिक्षित असा उड्डाणपुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या वर्किंग ऑर्डरचा देखील प्रश्न सुटला आहे . याबाबतची माहिती देण्यासाठी आज खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना बोलावले. त्यांनीही या पत्रकार परिषदेला हजेरी लावत नगरच्या विकासाच्या मुद्द्यावर नेहमीच सहकार्य असल्याचा संदेश दिला. वाचा: ऑगस्ट महिन्यामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू होईल. त्यासाठी ठेकेदार ही निश्चित झाला आहे. काही खासगी जमिनीचे भूसंपादनाचा प्रश्न असून तोही लवकर सुटेल. भूसंपादनाच्या मध्ये कोणी आल्यास त्याचे पैसे कोर्टामध्ये जमा करून जमीन सरकार ताब्यात घेईल. हा प्रकल्प दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणी अडथळा आणला नाही, तर तो नक्कीच पूर्ण होईल, असे खासदार विखे यांनी सांगतानाच या प्रकल्पासाठी केंद्र, राज्यातील नेते, महसूल प्रशासन, महापालिका पदाधिकारी यांच्यासोबत जगताप यांचेही सहकार्य मिळाल्याचे सांगितले. तसेच यामध्ये पक्षाचे राजकारण न आणता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावरच एकमेकांच्या विरोधात प्रचार करू, असेही त्यांनी सांगितले. तर, नगर शहराच्या वैभवात भर घालणार उड्डाणपुलाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला, हे चांगले झाले. नगरच्या विकासासाठी आमचे नेहमीच सहकार्य आहे, असे जगताप यांनी यावेळी सांगितले. वाचा: पत्रकार परिषदेला महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते.
Slider Widget
Thursday, 16 July 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment