मुंबई: राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारनं अलीकडंच सुरू केलेल्या '' या ऑनलाइन पोर्टलवरून महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पोर्टलच्या मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला आहे. वाचा: सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्याची पूर्वापार पद्धत आहे. अलीकडं त्याचं स्वरूप बदललं आहे. वृत्तपत्रे व चॅनेलच्या माध्यमातून या बाबतच्या जाहिराती दिल्या जातात. त्यावर राज्याच्या प्रमुखांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांचे फोटो असतात. 'महाजॉब्स' पोर्टलचीही अशीच जाहिरात सध्या करण्यात येत आहे. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'च्या दिशेनं पुढचं पाऊल' असा या जाहिरातीचा मथळा आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर सुभाष देसाई, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक व आदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना व राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचे छायाचित्र जाहिरातीत नाही. त्यावरूनच सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाचा: नाराजी दर्शवणारं ट्विट त्यांन केलं आहे. ''महाजॉब्स' ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची,' असा प्रश्न त्यांनी केला आहे. ' होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे,' अशी उद्विग्नता तांबे यांनी व्यक्त केली आहे. 'नोकऱ्यांचा विषय युवक काँग्रेसनं सातत्यानं लावून धरला आहे. रोजगार मेळावे भरवून आतापर्यंत सुमारे पाच लाख तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. निवडणुकीत युवक काँग्रेसच्या जाहिरानाम्यातही आम्ही हा मुद्दा घेतला होता. त्यामुळं मित्रपक्षांनी या विषयावर आम्हाला सोबत घ्यायला हवं होतं इतकंच आमचं म्हणणं आहे,' अशी भूमिका तांबे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना मांडली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर शिवसेना व राष्ट्रवादीची छाप दिसते. निर्णय प्रक्रियेतून काँग्रेसला डावलले जाते, अशी भावना काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीपासूनच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी तशी नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यावर पडदा पडला होता. तांबे यांच्या ट्विटमुळं पुन्हा काँग्रेसच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. वाचा:
Slider Widget
Thursday, 16 July 2020
महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी; कारण ठरली 'ही' जाहिरात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment