मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पोस्ट ऑफिस समोर एक जर्जर आहे. त्यामुळे या परिसरात एकच घबराट पसरली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, भानुशाली इमारत दुर्घटनेत दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अन्य दोन जण जखमी असून नेहा (४५) व भालचंद्र कानू (४८) अशी दोघांची नावे आहेत. नेहा यांची प्रकृती चिंताजनक आहे तर कानू यांना किरकोळ इजा झाली आहे. आज सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांनी फोर्ट येथील जीपीओ समोरील कबुतरखान्याजवळ असलेली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. ही तळमजला अधिक पाच मजली रहिवाशी इमारत आहे. इमारतीचा भाग कोसळताच जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील लोक घाबरले आणि आवाजाच्या दिशेने पळत सुटले. इमारतीचा काही भाग कोसळल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन करून घटनास्थळी पाचारण केलं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. स्थानिकांनीही ढिगारा उपसण्याच्या कामात अग्निशमन दलाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन, २ रेस्क्यू व्हॅन आणि १० डंपर्स कार्यरत आहेत. महापालिकेच्या ५० मजूरांच्या सहाय्याने हा ढिगारा उपसण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असल्याने या कामात अडथळा निर्माण होत आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याचं सांगण्यात येतं. आतापर्यंत दोघा जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. तर ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. म्हाडाच्यावतीने या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार होती. या दुरुस्तीचं कामही प्रगतीपथावर होतं. ही इमारत रिकामी करण्यात आल्यानंतरही त्यात काही लोक राहत होते, असं पालिकेनं स्पष्ट केलं. तर, फोर्ट परिसरातील या भानुशाली इमारतीची दुरूस्ती करण्यात येणार होती. त्यासाठी मालकांनी रहिवाशांकडून पैसेही जमा केले होते. मात्र करोनामुळे लाॅकडाऊन लागल्याने दुरूस्ती होऊ शकली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Slider Widget
Thursday, 16 July 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment