सुशांत प्रकरण: भाजप नेत्याचे शहांना पत्र; 'त्या' मंत्र्याची माहिती देण्यास तयार
मुंबई: प्रकरणात मुंबई पोलिसांवर कशा प्रकारे दबाव टाकला जात होता आणि कोणाकडून टाकला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. सीबीआयला ही माहिती देण्याची तयारी आहे, असं भाजपचे आमदार यांनी म्हटलं आहे. भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री यांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक निर्माते, दिग्दर्शकांची चौकशी केली होती. मात्र, काही लोकांना बोलावण्यात आले नव्हते. त्यावरून राज्य सरकारवर आरोप होत होते. मुंबई पोलिसांवर दबाव येत असल्याचा आरोप भाजपनं केला होता. आता भातखळकर यांनी अमित शहा यांना पत्र लिहून याबाबत माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. 'सुशांत प्रकरणाशी बॉलिवूड, ड्रग्ज आणि राजकीय नेत्यांच्या विषारी युतीचा संबंध आहे. ही युती चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राज्य सरकारमधील काही मंत्री निकराचे प्रयत्न करत होते. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील मंडळीची चौकशी सुरू केल्यानंतर विशिष्ट लोकांना चौकशीला बोलवू नये. बोलवायचेच असेल तर अमूक अमूकच स्टेंटमेंट घ्या, असा दवाब पोलिसांवर टाकला गेला होता. सीबीआयनं या साऱ्याचा पर्दाफाश करावा, अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे. वाचा: 'याबाबतची सर्व माहिती आमच्याकडे आहे. ती सीबीआयला देण्याची आमची तयारी आहे. सुशांतसिंह यांचा मृत्यू ही एक आत्महत्या आहे, असं दर्शवणारी वक्तव्ये व ट्वीट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. वाचा:
No comments:
Post a Comment