पिंपरी हादरले; दारू पिताना मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन घालून केला खून - NEWS E HUB

Slider Widget

Monday 31 August 2020

पिंपरी हादरले; दारू पिताना मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन घालून केला खून


पिंपरी हादरले; दारू पिताना मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन घालून केला खून

म. टा. प्रतिनिधी, : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी मिळून मित्राच्या डोक्यात वॉशबेसिन घालून केला. खून केल्यानंतर तिन्ही मित्र जवळच्या पोलिस चौकीत हजर झाले. आरोपी मित्रांनी आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले. रविवारी (३० ऑगस्ट) रात्री येथे ही घटना घडली. शुभम रणजित साठे (वय २१, एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा कापुरे (वय १९), अजय क्षीरसागर (वय २०) आणि ज्ञानेश्‍वर थोरात (वय २०, तिघेही रा. समता कॉलनी, थेरगाव) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. निरीक्षक विश्‍वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपी एकमेकांचे मित्र असून ते ऑनलाइन खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचे काम बंद होते. त्यामुळे ते सध्या घरीच होते.रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास चिंचवड काळेवाडी रस्त्यावरील चितराव गणपती मंदिराजवळ असलेल्या हॉटेलच्या मागे चौघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. किरकोळ वादातून चिडलेल्या आरोपींनी बाजूला पडलेले वॉशबेसिन शुभमच्या डोक्‍यात घातले. शुभम रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काळेवाडी चौकीत स्वतःहून हजर झाले. आरोपींनी घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर काळेवाडी चौकीतील पोलिसांनी त्यांना चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले. चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment