'आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय' - NEWS E HUB

Slider Widget

Tuesday, 1 September 2020

'आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय'


'आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय'

मुंबई: प्रकरणात चर्चेत असलेल्या संदीप सिंहचे व भाजपचे काय संबंध आहेत याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. त्यावरून माजी खासदार यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चित्रपट निर्माता असलेला हा बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटशी संबंधित असल्याची चर्चा आहे. संदीपची सुशांतशी चांगली मैत्री होती. सुशांत प्रकरणात ड्रगचा अँगल पुढं आल्यानं संदीपचं नावही या प्रकरणात जोडलं गेलं आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संदीपचे भाजपच्या नेते मंडळींशी मैत्रीचे संबंध आहेत. संदीप मागील वर्षी ठराविक कालावधीत महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात तब्बल ५३ वेळ कॉल केले होते, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे. भाजप कार्यालयातून संदीप सिंहशी कोण बोलायचा? त्याचा भाजपमधील हँडलर कोण आहे?, असे प्रश्न काँग्रेस सातत्यानं उपस्थित करत आहे. वाचा: काँग्रेसचे प्रवक्ते यांनी काल याच प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली व संदीप सिंह-भाजप व ड्रग कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनीही त्यास प्रतिसाद देत काँग्रेसची ही मागणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं स्पष्ट केलं. वाचा: या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्वीट केलं आहे. नीलेश राणे हे या प्रकरणात सातत्यानं बोलत असून पर्यावरण मंत्री यांच्याकडं बोट दाखवत आहेत. आजच्या ट्वीटमध्येही त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काही काँग्रेसवाल्यांना शिवसेनेने पगारावर ठेवले आहे. रोज उठून काँग्रेसवाले संदीप सिंह आणि भाजपचं कनेक्शन शोधतायत. मीडियावाले सुद्धा दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातले खरे आरोपी शोधायचं विसरून फालतू प्रकरणात गुंतले आहेत,' असं नीलेश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment